नागपूरकरांनो, आता तरी सुधरा हो... Live Marathi News | मराठी ताज्या बातम्या | Sakal Media |

Sakal 2021-04-28

Views 214

नागपूर : उपराजधानीत दररोज शेकडोंच्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. शहरात अशी एकही गल्ली नाही, जिथे कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. मात्र, त्याऊपरही नागरिक सुधरायला तयार नाहीत. "सोशल डिस्टन्सिंग' तर सोडाच साधे मास्कही वापरताना दिसत नाही. रामदासपेठ परिसरातील सेंट्रल बाजार रोडवरील खाऊगल्लीतील हे दृष्य नागपूरकरांच्या बेफिकीर वागण्याचे उत्तम उदाहरण आहे. येथे खाण्यासाठी येणारे नागरिक "सोशल डिस्टन्सिंग' नियमाचा अक्षरश: फज्जा उडविताना दिसत आहेत. उल्लेखनीय म्हणजे, हा सर्व प्रकार दुकानदारांच्या डोळ्यासमोर होतो आहे. तरीदेखील ते मुग गिळून बसत असल्याचे अत्यंत दुर्दैवी व निराशाजनक चित्र येथे दररोज सायंकाळच्या सुमारास पाहायला मिळते. मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे यांनी पुन्हा लॉकडाउन लावण्याचे संकेत दिले आहेत. नागपूरकरांची अशीच वर्तणूक राहिल्यास शहरात नाईलाजाने पुन्हा कडक लॉकडाउन लावला जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. (व्हिडिओ : प्रतीक बारसागडे)

Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS