कंगना प्रकरणात नवनीत राणांचा सरकारवर आरोप I Latest Marathi News | मराठी ताज्या बातम्या |

Sakal 2021-04-28

Views 778

अमरावती : चित्रपट अभिनेत्री कंगना राणावतच्या कार्यालयावर आज मुंबई महापालिकेने कारवाई केल्याने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा संतापल्या असून, सत्तेच्या मोहात सरकार ताकदीचा दुरुपयोग करीत असल्याची टीका त्यांनी केली. मुंबई महापालिका शिवसेनेच्या ताब्यात आहे व ही हुकूमशाही चांगली नाही, असे नवनीत राणा म्हणाल्या. अभिनेता सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येप्रकरणी कंगनाने सातत्याने शिवसेना व पक्षाच्या नेत्यावर टीका केली होती. त्यातूनच कंगनाला नोटीस देण्यात आली व तिच्या कार्यालयावर कारवाईसुद्धा करण्यात आल्याचे नवनीत राणा म्हणाल्या.
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS