भाजपाच्या वतीने महाविकास आघाडीच्या निषेधार्थ आंदोलन

Sakal 2021-04-28

Views 1

अकोला : भाजपाच्या वतीने जिल्ह्यात दरवाढीसाठी आंदोलन करण्यात आले. दुधाचा दर कमी करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडणाऱ्या व घरगुती व व्यावसायिक प्रतिष्ठानाचे भरमसाठ विज आकारणी करुन ग्राहकांची लूट करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा जाहीर करण्यात आला.
आज शनिवारी सकाळी आंदोलनाला सुरवात झाली. तालुक्यातील वाडेगाव, निंबा फाटा, पारस व रिधोरा येथे हे आंदोलन करण्यात आले. दुध खरेदी दर ३० रुपये करा, गाईच्या दुधाला सरसकट प्रतिलिटर १० रुपये व दुध पावडर निर्यातीला ५० रूपये अनुदान द्यावे अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
(व्हिडिओ - विवेक मेतकर)

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS