सावधान इंडिया, क्राईम पेट्रोल, संस्कृती, परिचय यासारख्या हिंदी मालिका, महिमा आई जगदंबेचा, त्राटक, आम्ही बेफिकीर यासारखे मराठी चित्रपट, जय मल्हार, शौर्य, ग्रहण, छत्रीवाली, अल्टी पल्टी सुमडीत कल्टी, देव पावला, बाळूमामाच्या नावानं चांगभलं यासारख्या मालिका, लघुपट, नाटक, एकांकिकामधून अभिनेत्री रुपाली गायखे हिने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे सध्या चित्रीकरणही बंद आहे. हा मिळालेला वेळ ती व्यायामासाठी सत्कारणी लावत आहे. रसिकांनीही घरात राहूनच व्यायाम करावा, असे आवाहन तिने केले आहे.