ट्रिपल सीट, प्रिय, क्षितिज, यंग्राड, रेती यासारखे विविध मराठी चित्रपट, डॉक्टर डॉन, असं सासर सुरेख बाई, तू अशी जवळी राहा, ग्रहण, जाडू बाई जोरात यासारख्या मालिकांमधून अभिनेत्री पूनम पाटील हिने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. मात्र सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असल्याने चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण बंद आहे. या मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून ती नियमित व्यायाम करत आहे. रसिकांनाही ती व्यायामाचा सल्ला देत आहे