तू अशी जवळी राहा, असं सासर सुरेख बाई, नकोशी तरीही हवीहवीशी, कन्यादान यासारख्या गाजलेल्या मालिका, भाई, टाईम, साहेब यासारखे विविध चित्रपट, अनन्या, संध्याछाया, वऱ्हाड निघालय लंडनहून यासारखी व्यावसायिक नाटकांमधून अभिनेता सिद्धार्थ बोडके याने आपल्या अभिनयाची छाप पाडली आहे. सध्या लॉकडाऊनच्या काळात मिळालेल्या वेळेचा उपयोग तो व्यायाम करण्यासाठी करतो आहे. रसिकांनाही घरातच राहून व्यायाम करण्याचे आवाहन तो करीत आहे.