बरड, प्रेमात असे का घडते, येडू आईच्या नावानं, ब्लॅक आऊट, रेती, गोट्या, जुगाड, भुईभोग यासारखे विविध चित्रपट, असं सासर सुरेख बाई यासारख्या विविध मालिकांमध्ये अभिनेता कृष्णा मरकड याने आपल्या अभिनयाने ठसा उमटवला आहे. सध्या लॉकडाऊन असल्याने चित्रीकरण बंद आहे. या मिळालेल्या वेळेत दररोज व्यायाम करून फिटनेस जपत आहे. रसिकांनीही घरात राहूनच व्यायाम केला पाहिजे व कोरोनाला पळवून लावले पाहिजे, असे आवाहन त्याने केले आहे.