नाशिकचा असलेला अभिनेता कांचन पगारे याने मालिका, मराठी चित्रपट, बॉलीवूड चित्रपटातून आपला दबदबा निर्माण केला आहे. आक्रोश, पप्पू कान्ट डान्स साला, गब्बर, डॉली की डोली यासारख्या अनेक चित्रपटातून अभिनयाची छाप पाडली आहे. सध्या चित्रीकरण बंद असल्याने घरातच राहून दिवसातून दोनदा व्यायाम करत आहे. आपणही घरातच राहा, व्यायाम करा, निरोगी राहा असा सल्ला तो देत आहे