पुणे : पुणे जिल्ह्यात अॅमेझॉन कंपनी डिलीव्हरी बॉय संपावर गेले आहेत. जवळपास दहा हजार डिलीव्हरी बॉय गेल्या 3 दिवसांपासून संपावर आहेत. अॅमेझॉन मधील डिलिव्हरी असोसिएट्स, डिलिव्हरी बॉय यांच्यावर लादलेल्या आर्थिक व मानसिक पिळवणूकीसंदर्भात पुणे जिल्ह्यातील अनेक डिलीव्हरी बॉय सध्या आपल्या न्याय आणि हक्कासाठी संपावर आहेत. त्यांनी त्यांच्या आस्थापनेमधील सर्व कर्मचारी वर्गाशी याबाबत सखोल चर्चा केली असता त्यांच्यावर कंपनीकडून अन्याय होत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्याचे समजते. या सर्वांशी प्राथमिक चर्चा केली असता त्यांनी अॅमेझॉन कंपनीकडून मागण्या पूर्ण व्हाव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.प्रस्तावित मागण्यांवर कंपनीने योग्य त्या प्रकारे विचार करून लवकरात लवकर त्यांची अंमलबजावणी करावी आणि या सर्व कामगार वर्गाला न्याय मिळेल असा निर्णय घ्यावा अशी विनंती या डिलीव्हरी बॉयकडून करण्यात आली आहे.