Pune Traffic Police : पुणे वाहतूक पोलिसांचा मुजोर कारभार | Nana Peth| Pune Traffic | Sakal Media

Sakal 2021-08-20

Views 488

Pune Traffic Police : पुणे वाहतूक पोलिसांचा मुजोर कारभार | Nana Peth| Pune Traffic | Sakal Media
पुणे वाहतूक पोलिसांचा मुजोर (Pune Traffic Police)कारभार पुन्हा एकदा समोर आलाय. वाहतूक पोलिसांनी (Traffic Police)नाना पेठ (Nana Peth)परिसरात एका दुचाकीस्वाराला गाडीसकट टो केलं असून टेम्पोत भरलंय. ही धक्कादायक घटना गुरूवारी पावणे-पाचच्या सुमारास घडली. वाहतूक पोलिसांकडून चौका-चौकात काही न काही कारणे सांगून दुचाकीस्वारांची अडवणूक केली जाते. आणि त्यांच्याकडून वसुली केली जाते. असे प्रकार शहरात सर्रासपणे घडतात. गुरूवारी संध्याकाळी समर्थ वाहतूक पोलिस विभागाअंतर्गत असलेल्या नाना पेठ परिसरात वाहतूक पोलिसांनी गाडी सकट दुचाकीस्वाराला उचलून टेम्पोत भरलं. यावेळी वाहतूक पोलिसानं दुचाकीस्वाराची गाडी नो-पार्कींगमध्ये असल्याचा दावा केला. परंतु, वाहनचालक जर चुकत असेल तर अशा पध्दतीनं कारवाई करणं कितपत योग्य आहे असा सवाल पुणेकर विचारतायत.
#Pune #PuneTrafficPolice #Nanapeth #Twowheeler #Police

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS