पुणे- चोरांना पाहून पोलिसांनीच काढला पळ
पुण्याच्या औंधमधील सिद्धार्थनगर भागात चोर घुसले आणि त्यांनी वॉचमनला चाकू दाखवला. चोर इमारतीत शिरल्याचे समजताच सोसायटीमधील एका व्यक्तीने पोलिसांना फोन केला. पण चोरांना पकडण्यासाठी आलेले पोलीस चोरांना पाहून स्वत:च घटनास्थळावरून पळून गेल्याची दृश्य सीसीटीव्हीमध्ये दिसत आहेत.