व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने मनसेच्या वतीने दादर शिवाजी पार्क येथे सेल्फी पॉईंट तयार करण्यात आला आहे. याचं उद्घाटन पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते पार पडलं. यावेळी राज ठाकरे पत्नी आणि नातवासह सेल्फी पॉईंटच्या येथे आले होते. त्यामुळे नागरिकांसह कार्यकर्त्यांची मोठी गर्दी येथे पाहायला मिळाली. सेल्फी पॉईंट जवळ राज ठाकरेंनी काहींसोबत सेल्फी देखील काढले.