मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देऊ नये; कुणबी समाजाचा आरक्षणाच्या संरक्षणासाठी एल्गार

ETVBHARAT 2025-10-09

Views 42

रायगड : ओबीसी आरक्षण धोक्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कुणबी समाज आक्रमक झाला आहे. मुंबईतील आंदोलनात सहभागी होण्यासाठी रायगड जिल्ह्यातील उरण, पनवेल, पेण, माणगाव, महाड, तसंच रत्नागिरी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांतून पहाटेपासूनच कुणबी समाजाचे हजारो बांधव निघाले आहेत. एसटी, खासगी बस, जीप आणि शेकडो कार यांचा मोठा ताफा मुंबईच्या दिशेनं धाव घेत आहे. कुणबी समाजाला ओबीसी आरक्षणातून वगळू नये. ओबीसी आरक्षण कोट्यातून इतरांना लाभ देऊ नये. सरकारनं या मागण्यांकडं दुर्लक्ष केल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशा मागण्या आंदोलनकर्त्यांनी केल्या आहेत. यावेळी काहींनी 'ओबीसी आरक्षण आमचं हक्काचं!' अशी घोषणा दिली. पोलिसांनी मुंबईसह विविध ठिकाणी वाहतुकीसाठी बंदोबस्त ठेवला आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही मार्ग वळवले आहेत. "कुणबी समाजाला स्वतंत्र ओळख देण्याच्या नावाखाली आमचं आरक्षण हिरावून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. हे आम्ही होऊ देणार नाही," अशी प्रतिक्रिया ओबीसी समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS