शिर्डी : राज्यात सध्या बदल्याच राजकारण सुरु असून यातून काहींना बदला ही मिळतो, एका खात्याचे दोन तुकडे होताना कधी पहीले नव्हते मात्र आता महाराष्ट्रात एकाला चने आणि दुस-याला फुटाणे असे वाटून दिलेय. जे पेराल तेच उगवेल अशी टिका विजय वडेट्टीवार यांनी संगमेनर मध्ये जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचे नाव न घेता केलाय.
विजय वडेट्टीवार संगमनेर येथे बाळासाहेब थोरात यांच्या प्रेरणा दिन व पुरस्कार सोहळ्यासाठी आले होते. या दरम्यान भाषण करताना त्यांनी जलसंपदा खात्यातील कृष्णा गोदावरी विखे पाटलांना तर गिरीश महाजनांना विदर्भ आणि तापी खोरे अस खात विभागून देण्यात आलय. यावर विजय वडेट्टीवार यांनी टिका करताना एका चने तर दुस-याला फुटाणे दिल्याच विधान केलय. दोन विभूतींच्या महान कार्यातून हा संगमनेर परिसर उभा राहिला आहे. राज्यातील पहिल्या विकसित तीन तालुक्यांमध्ये बाळासाहेबांच्या नेतृत्वाखालील संगमनेर तालुक्याचा समावेश आहे. जय पराजय होत असतात. येणारे दिवस आपलेच असतील. त्यामुळे भाऊसाहेबांनी लावलेले विकासाचे झाड सुकू देऊ नका. बाळासाहेब थोरात ते शांत संयमी नेते आहे त्यांचे मार्गदर्शन आम्हा सर्वांना कायम हवे आहे. सध्याचे राजकारण हे बदल्याचे झाले आहे. यातून महाराष्ट्राचे नुकसान होत असून पुन्हा एकदा चांगले राजकारण करण्यासाठी सर्वांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कटिबद्ध राहावे असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले.