देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावला. पण नंतर सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाला आव्हान देण्यात आलं. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यात समन्वय नसल्याने न्यायालयात प्रभावी बाजू मांडली गेली नाही. म्हणून मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलं नाही, असं मत मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी व्यक्त केलंय.
#LokmatNews #MaharashtraNews #Politics