चोपड्याचे माजी आमदार बॅरिस्टर देवराम निकम यांचे नातू रोहित निकम यांनी भाजपात प्रवेश केलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी भाजपात प्रवेश केला. रोहित निकम हे जळगाव जिल्हा दूध संघाचे विद्यमान संचालक आहेत. राज्याचे विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम यांचे ते पुतणे देखील आहेत. त्यांच्या आई शैलजा निकम या कृभको या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेच्या दोन टर्म संचालक होत्या.