अभिनेत्री अदा शर्मा ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. नेहमी आपले नवनवे व्हिडीओ ती शेअर करत असते. हनुमान जयंतीनिमित्त अदाने असाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये ती हनुमान चालीसा म्हणत लाठीकाठीचा खेळ देखील खेळतेय. तिच्या या व्हिडीओला सोशल मीडियावर अनेकांनी पसंती दर्शवली आहे.