देशभरात हनुमान जयंती साजरा केली जात आहे. यानिमित्ताने येवल्यातील चित्रकार गोरख बोरसे याने चक्क राम फळावरच हनुमानाच्या विविध कलाकृती साकारल्या आहेत. हनुमान जयंतीचं औचित्य साधून त्याने हे चित्रं रेखाटायचं ठरवलं. तर याआधी देखील गोरखने दडग आणि बदामावर छत्रपती शिवाजी महाराज व अन्य अशा कलाकृती रेखाटल्या आहेत.