पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं बुधवारी निधन झालं. त्यांचं निधन होऊन तीन दिवसही होत नाहीत तोच आता पुणे लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची चर्चा सुरू झाली आहे. एवढंच नाही तर गिरीश बापट यांच्या निधनानंतर लगेच पुण्याचे भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे 'भावी खासदार' म्हणून बॅनर लागलेत. त्यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. प्रचंड टीका होऊ लागल्यानंतर हे बॅनर अखेर हटवण्यात आले आहेत.
#GirishBapat #Pune #Bypolls #JagdishMulik #BJP #Sambhajinagar #Maharashtra #UddhavThackeray #SanjayRaut #Shivsena #EknathShinde #Mumbai #Dabbawala #Mumbaikar #ChhatrapatiSambhajiNagar