गेल्या वर्षी उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठणाचा आग्रह खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी धरला होता. त्यानंतर राज्यातील वातावरण चांगलंच तापलं होतं. आता येत्या ६ एप्रिलला अमरावतीत सामूहिक हनुमान चालीसा पठणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. त्या निमित्ताने अमरावतीसह राज्यात झळकलेल्या पोस्टर्स वर नवनीत राणा यांचा उल्लेख "हिंदू शेरणी" म्हणून करण्यात आला आहे. याच निमित्ताने नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.