नागपूरमध्ये झालेल्या हिवाळी अधिवेशनात विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केला होता. सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना धान उत्पादनाकरिता प्रति हेक्टरी १५ हजार रुपये या प्रमाणे दोन हेक्टर मर्यादेत प्रोत्साहनपर रक्कम बोनस म्हणून देण्यात येणार असून धान उत्पादक जिल्ह्यातील ५ लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. अशी घोषणा एकनाथ शिंदे यांनी केली. मात्र याला तब्बल अडीज महिने उलटूनही अद्याप शेतकऱ्यांच्या बँक खात्यात बोनसचे पैसे जमा झालेले नाहींत. तर सरकारने बोनसची घोषणा मात्र केली पण अद्यापही पैसे जमा न झाल्याने सरकारने शेतकऱ्यांची थट्टा तर केली नाहीं ना? असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित होतोय.
#farmers #abdulsattar #nagpur #devendrafadnavis #eknathshinde #shivsena #maharashtra #hwnews