मोदी आडनावाबद्दलच्या मानहानी प्रकरणात शिक्षा सुनावल्यानंतर आता राहुल गांधींना मोठा धक्का बसला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान सर्व चोरांचे आडनाव मोदी कसे? असा प्रश्न विचारत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. याप्रकरणी काल सुरत न्यायालयाने राहुल गांधी यांना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्यानंतर आता राहुल गांधी यांचं संसद सदस्यत्व रद्द झाल्याची माहिती मिळाली असून, त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवण्यात आलं आहे. लोकसभा सचिवालयानं ही मोठी कारवाई केली आहे.