सर्व आमदारांनी आपल्या मतदारसंघात झाडं लावावीत, असं आवाहन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानपरिषदेत केलं. यावेळी मुनगंटीवार यांनी झाड आणि फळाचं उदाहरण देताना भाजपा आणि शिवसेनेच्या (ठाकरे गट) तुटलेल्या युतीबाबत अप्रत्यक्षपणे भाष्य केलं. त्यावर उद्धव ठाकरेंनीही आपल्या शैलीत मुनगंटीवारांना चिमटा काढला तेव्हा सभागृहात एकच हशा पिकला.