उद्धव ठाकरे हे भाजपाबद्दल चांगलं बोलतील हे आता अशक्य आहे. याच जन्मी नाही, तर पुढील जन्मी देखील उद्धव ठाकरे यांनी भाजपाबद्दल चांगलं बोलावं ही आता आमची अपेक्षा नाही, असा टोला राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी लगावला आहे. भाजपा हा पक्ष भ्रष्ट जनता पक्ष आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली केली होती. त्याला सुधीर मुनगंटीवार यांनी उत्तर दिलं. पुण्याच्या आळंदीत
महाराष्ट्र शासनाच्या वतीने दिला जाणाऱ्या ज्ञानोबा-तुकाराम २०१९-२२ पुरस्कार सोहळ्यासाठी मुनगंटीवार उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.