राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करत भाजपा आमदारांनी विधानसभेत गदारोळ केला. यावेळी भाजपासह शिवसेना आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोडेमारो आंदोलन केले. यावेळी आमदारांनी केलेल्या कृतीवर आक्षेप घेत विरोधी पक्षनेते अजिप पवार यांनी मुद्दा उपस्थित केला याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की ,‘वीर सावरकरांबद्दल चुकीचं बोलतात, त्याचा निषेध झाला पाहिजे. आम्हीही त्याचा निषेध करतो. यासह विधिमंडळाच्या आवारात अशाप्रकारे जोडे मारो आंदोलन करू नये. मी सत्तारूढ पक्षाच्या वतीने अध्यक्षांना सांगतो की अशाप्रकारे सभागृहाच्या आवारात कुठल्याही नेत्याला जोडे मारो आंदोलन केले जाणार नाही आणि ते योग्य नाही'