नाशिकमधील सिन्नर तालुक्यात लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासह पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण पार पडले. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे, छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील अनेक नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात 'माणसं जोडण्याची ताकद मुंडे साहेबांकडून शिकण्यासारखी आहे. त्याच्या निधनाचा तो दिवस आजही आठवला तरी अंगावर शहारे येतात. तो दिवस काळा दिवस होता' असे विधान त्यांनी यावेळी केले आणि गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींना उजाळा दिला.