Deepak Sawant: माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश!; ठाकरेंना मोठा धक्का
निवडणूक आयोगाने 'शिवसेना' हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. त्यानंतर ठाकरे गटाचे अनेक नेते आणि कार्यकर्ते शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला असून ठाकरे गटाचे नेते व माजी आरोग्यमंत्री दीपक सावंत आज एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी सावंत यांचे पक्षात स्वागत केले