दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना ईडीने अटक केली. असं असतानाच राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रिफ यांच्या घरावर ईडीने पुन्हा छापा टाकला आहे. या प्रकरणी खासदार संजय राऊतांनी ईडीच्या कारवाईवरून प्रश्न उपस्थित केला आहे. सदानंद कदम यांच्या अटकेआधीच मुलुंडचे पोपटलाल बोंबलत होते, असा अप्रत्यक्ष टोला राऊतांनी किरीट सोमय्यांना लगावला.