जादूटोण्यासाठी मासिक पाळीतील रक्त विकण्याचा दुर्दैवी प्रकार पुण्यातील विश्रांतवाडी येथे आज उघडकीस आला आहे. यावर मासिक पाळीवर काम करणाऱ्या समाजबंध संस्थेचे कार्यकर्ते सचिन आशासुभाष यांनी आपली प्रतिक्रिया दिली. 'धर्माच्या नावाने व पैशांच्या प्रलोभनातून घडलेल्या या घटना चुकीच्या असून या प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई झाली तरच अशा प्रकारांना काही प्रमाणात आळा बसेल‘ अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली.