नागालँडमध्ये राष्ट्रवादीनं भाजपाप्रणित आघाडीला पाठिंबा दिला आहे. हा पाठिंबा मुख्यमंत्र्यांना आहे भाजपाला नाही, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं असलं तरी त्यावरून आता राजकीय वातावरण तापलं आहे. या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गट आणि भाजपाला सवाल केला आहे. राष्ट्रवादीच्या सहभागाने आता भाजपा नागालँड सरकारमधून बाहेर पडणार का? तर शिंदे गट भाजपामधून बाहेर पडणार का? तुमची तत्वनिष्ठा, तुमचं हिंदुत्व आता देशाला कळू द्या, असं भास्कर जाधव म्हणाले.