केज विधानसभा मतदारसंघाच्या भाजपाच्या आमदार नमिता मुंदडा या आपल्या दोन महिन्यांच्या बाळाता घेऊन विधानभवनात दाखल झाल्या. महिला दिनाचं औचित्य साधून सभागृहात महिला लक्षवेधी सुचना मांडणार आहेत. या पार्श्वभूमीवर नमिता मुंदडा यांनी प्रत्येक अधिवेशनात महिलांना एक दोन दिवस लक्षवेधीसाठी राखीव ठेवले जावेत, अशी भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी हिरकणी कक्षाच्या सुविधेसाठी विधानसभा अध्यक्षांचे आभारही मानले.