'गुजरात सरकारने ३५० कोटी रुपये कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी मदत जाहीर केली. आपल्यापेक्षा लहान राज्य असून त्यांनी ही मदत केली. नाफेडने मार्केटमध्ये जाऊन खरेदी करावी हे आम्ही सांगत असताना ते बाहेरच्या बाहेर खरेदी करत आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठं उत्पादक आहे. गुजरात सरकार हे करत आहे, मग महाराष्ट्र सरकार का करत नाही?' असा सवाल राष्ट्रवादी नेते छगन भुजबळ यांनी उपस्थित केला. 'शेतकऱ्यांच्या संसाराची होळी आणि आयुष्याचा बेरंग झाला' असे म्हणत भुजबळांनी राज्य सरकारला टोला मारला