उद्धव ठाकरे यांची उद्या रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथे सभा आहे. या सभेला मुस्लिमांनी उपस्थित राहावे, असे आवाहन मराठी मुस्लीम सेवा संघाचे अध्यक्ष फकीर ठाकूर यांनी केले. यावर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी अमरावतीत बोलताना उद्धव ठाकरे यांना टोला लगावला, 'कुणी बोलले म्हणून मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी राहत नाही, सर्व समाजाला न्याय देण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करत आहे, उद्धव ठाकरे यांच्या सभेचा मुस्लिम समाजावर काही परिणाम होणार नाही, मुस्लिम समाज एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी आहे' अशी प्रतिक्रिया कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.