चिंचवडमध्ये भाजपा तर कसबा पेठमध्ये मविआच्या उमेदवाराने विजय मिळवला आहे. कसबामधील पराभव हा भाजपासाठी धक्का मानला जात असून राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया त्यावर येत आहेत. तर दुसरीकडे मविआ कसब्यातील आपला विजय साजरा करत आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मविआने एका विजयाने हुरळून जाऊ नये, असा टोला त्यांनी लगावला. तर कसब्यात कुठे कमी पडलो यावरही विचार केला जाईल, असंही शिंदे म्हणाले.