गेल्या महिन्याभरापासून राज्यभर चर्चेचा विषय ठरलेल्या कसबा पोटनिवडणुकीसाठी आज मतमोजणी पार पडली. या मतमोजणीमध्ये मविआचे उमेदवार काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांचा मोठा विजय झाल्याचं पाहायला मिळत आहे. यावर प्रतिक्रिया देताना टिळक कुटुंबातील सदस्य व काँग्रेस नेते रोहित टिळक म्हणाले की, 'मी रवींद्र धंगेकर यांचे अभिनंदन करतो. सगळ्या मतांची मोट बांधली तर उमेदवार बघून मतदान होतं. यावेळी सगळे एकत्र आले होते म्हणून ही निवडणूक जनतेची निवडणूक झाली होती.
उमेदवारीला घेऊन नाराजीचा सुर सुरवातीपासून होता'
रिपोर्टर: सागर कासार