कसब्यात मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी विजयी गुलाल उधळला आहे. कार्यकर्त्यांकडून त्यांचं अभिनंदन केलं जातं आहे. यावेळी दिवंगत मुक्ता टिळक यांचे चिरंजीव कुणाल टिळक यांनी देखील धंगेकराचं अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच कसब्यातील पराभवावर भाजपाला विश्लेषण करण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले.