"ही सर्व कंत्राटी लोकं"; Arvind Sawant यांची ओवेसींसह भाजपावर टीका
ठाकरे गटाच्यावतीने शिवगर्जना मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे. याविषयी खासदार अरविंद सावंत माहिती देत होते. यावेळी ओवेसांविषयी प्रश्न विचारला असता ते म्हणाले ओवेसी हे भाजपाची बी टीम आहे. जेव्हा मुस्लिमांची एकता निर्माण होते तेव्हा ओवेसींना पाठवून द्यायचं आणि त्यांची एकता भंग करायची. याचा फायदा नंतर भाजपाला होईल, अशा शब्दांत अरविंद सावंत यांनी टीका केली आहे.