"राज साहेब हे नेहमीच..."; राज ठाकरेंच्या भेटीनंतर Shiv Thackeray ची प्रतिक्रिया
Big Boss 16 चा उपविजेता शिव ठाकरे याने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. भेटीनंतर माध्यमांशी शिवने संवाद साधला. राज ठाकरे यांनी आपलं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. तसंच प्रत्येक मराठी तरुण व कलाकारच्या मागे राज ठाकरे कायम असतात, असं शिवने म्हटलं. यावेळी त्याने आपल्या आगामी नव्या प्रोजेक्टबद्दल काही माहिती दिली आहे.