शिवसेना हे पक्षनाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा मोठा निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा पाहायला मिळत आहे. एकीकडे ठाकरे गटाकडून या निर्णयाविरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यात आली असताना दुसरीकडे शिंदे गटाकडून शिवसेनेच्या कार्यालयांवरही दावा सांगितला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज महाराष्ट्रातील जिल्हा प्रमुखांची बैठक घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत शिंदे गटासह निवडणूक आयोगावरही टीकास्र सोडलं. निवडणूक आयोगच बरखास्त करण्याची मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली