Sidharth Malhotra-Kiara Advani: मिडियासमोर येत, शुभेच्छा स्वीकारत सिद्धार्थ-कियाराने वाटली मिठाई
बॉलिवूडमधील लोकप्रिय सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी ही जोडी ७ फेब्रुवारीला विवाहबंधनात अडकली. जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसमध्ये कियारा व सिद्धार्थचा शाही विवाहसोहळा पार पडला. सिद्धार्थ-कियाराच्या विवाहसोहळ्याला बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. सिद्धार्थ-कियाराच्या शाही विवाहसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मुंबईत लग्नाच्या रिसेप्शनपूर्वी सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी यांनी मीडियाला मिठाई वाटली.