CM Shinde-Girish Bapat:गिरीश बापट यांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री म्हणाले, "कसबा आणि चिंचवड दोन्ही..."
भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार गिरीश बापट यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे घोले रोडवरील महात्मा फुले वस्तु संग्रालयात तब्येतीची विचारपूस केली. त्यावेळी ‘खासदार गिरीश बापट यांची सदिच्छा भेट घेतली. ते माझे जुने सहकारी आहेत. आम्ही विधानसभेत एकत्र काम केले आहे. त्यामुळे जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या’, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खासदार गिरीश बापट यांच्या भेटीनंतर सांगितले. 'कसब्याची चिंता करू नका, मी इथे बसलोय, कार्यकर्त्यांचे नेटवर्क आहे. कसबा भाजपाच जिंकेल' असे बापट यांनी सांगितल्याचे शिंदे म्हणाले.