केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग पाचवा केंद्रीय अर्थसंकल्प संसदेत सादर केला. यावेळी विविध क्षेत्रांसाठी महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आल्या. निर्मला सीतारमण यांनी एक तासाहून अधिक वेळ अर्थसंकल्पाचं वाचन केलं. अर्थसंकल्प सादर करताना त्यांनी चुकून ‘ओल्ड पॉल्युटेड व्हेहिकल’ ऐवजी ‘ओल्ड पॉलिटिकल व्हेहिकल' असा शब्द उच्चारला. यावर सभागृहात एकच हशा पिकला.