Budget 2023: अर्थसंकल्पात 'महिला सन्मान बचत प्रमाणपत्र' योजनेची घोषणा, Nirmala Sitharaman म्हणतात...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत देशाचा २०२३-२४ चा अर्थसंकल्प सादर केला. महिला सक्षमीकरणाचा मुद्दा लक्षात घेत अर्थसंकल्पात महत्त्वाची घोषणा करण्यात आली आहे. 'महिला सन्मान बचत पत्र' योजना आणणार असल्याचं निर्मला सीतारमण यांनी म्हटलंय. यामध्ये एका महिलेच्या नावावर २ लाख रुपयांपर्यंततची ठेव सुविधा असेल.