'धनुष्यबाण बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार'; Deepak Kesarkar यांचा ठाकरेंना चिमटा
धनुष्यबाण हे बाळासाहेबांचे आहे आणि त्यामुळे ते बाळासाहेबांच्या शिवसेनेलाच मिळणार, असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. तसंच भारत जोडो यात्रेत सहभागी झालेल्या खासदार संजय राऊतांवरही त्यांनी नाव न घेता टीका केली.