गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत कुस्तीपटूंचं सुरू असलेलं आंदोलन अखेर मागे घेण्यात आलं आहे. कुस्तीपटूंच्या तक्रारींची दखल घेत योग्य ती कारवाई केली जाईल, या केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आलं आहे. कुस्तीपटूंच्या आरोपांनंतर भारतीय कुस्ती महासंघाला (WFI) नोटीस बजावण्यात आली होती. त्यानुसार ७२ तासांत महासंघाला उत्तर देण्यास सांगितलं आहे. तसंच एक समिती देखील स्थापन करण्यात आली असून चार आठवड्यांत यासंदर्भातील अहवाल सादर केला जाईल, अशी माहिती अनूराग ठाकूर यांनी दिली.