दिल्लीच्या जंतरमंतरवर कुस्तीपटूंच्या धरणे आंदोलनात सीपीएमच्या नेत्या वृंदा करात यांचेआगमन झाले. त्या निषेधाचा फलक घेऊन मंचावर आल्या मात्र त्यांना तिथल्या कुस्तीपटूंच्या विरोधाला सामोरे जावे लागले. कुस्तीपटूंनी वृंदा करात यांना माईक देण्यास नकार दिला आणि हा मंच राजकीय नसल्यामुळे त्यांनी मंचावरून उतरावे अशी विनंती केली.