नाशिक (Nashik) पदवीधर मतदारसंघात आता चुरस वाढली आहे. त्यात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेले भारतीय जनता पक्षाचे (BJP) पदाधिकारी धनंजय जाधव (Dhananjay Jadhav) यांनी आज माघार घेतली आहे. तर जाधव यांची ही माघार म्हणजेच सत्यजित तांबेंसाठी भाजपने मार्ग मोकळा केला असल्याचं बोललं जातंय. दरम्यान, धनंजय जाधव यांनीही माघार घेत असतानाच मोठं विधान केले आहे. ‘नाशिक पदवीधर मतदारसंघात भाजप सत्यजित तांबे (Satyajeet Tambe) यांना पाठिंबा देऊ शकतो, त्यांच्या लीडसाठी आम्ही प्रयत्न करू,’ असे जाधव यांनी म्हटले आहे.
#SatyajeetTambe #Nashik #DevendraFadnavis #DhananjayJadhav #Congress #NanaPatole #SudhirTambe #BJP #MLC #Graduate #Elections #Maharashtra