राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार काल थोडक्यात बचावले. बारामती येथील एका रुग्णालयाचं उद्घाटन केल्यानंतर अजित पवारांची लिफ्ट चौथ्या मजल्यावरून कोसळली. यावर बोलताना ते एका कार्यक्रमात म्हणाले की, 'काहीकाळ मी घाबरलोही होतो, कदाचित आज श्रद्धांजली वाहावी लागली असती' असं भर सभेत बोलताना त्यांनी सांगितलं. त्या लिफ्टमध्ये पुण्यातील ज्येष्ठ डॉक्टर हर्डीकरही होते. शनिवारी पिंपरी चिंचवडच्या ज्या हॉस्पिटलमध्ये हा प्रकार घडला. त्या दिवशी नेमकं काय घडलं याचा आढावा घेतला कृष्णा पांचाळ यांनी.
#AjitPawar #lift #accident #hospital #pimprichinchwad