महाराष्ट्रात सध्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. अशात नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत ट्विस्ट पाहायला मिळाला. पदवीधरसाठी काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी जाहीर केली होती. पण ऐनवेळी सुधीर तांबेंऐवजी त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यानंतर शिवसेना ठाकरे गटानं अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर करून नवा ट्विस्ट आणला.
#ShubhangiPatil #SatyajeetTambe #UddhavThackeray #Matoshree #Shivsena #NashikElections #SudhirTambe #Congress #BalasahebThorat #AjitPawar #NanaPatole #MVA #MahavikasAghadi