राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राज्यपालांनी शिवरायांचा एकेरी उल्लेख केला असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केला आहे. याचा एक व्हिडीओ देखील त्यांनी पोस्ट केला आहे. यावरून आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी शिवरायांचा एकेरी शद्बात उल्लेख केला. आम्ही पूर्वीपासून या मुद्द्यावर लढतच आहोत. मात्र जे सरकारमध्ये फेविकॉल लावून बसले आहेत, ते सगळे या विषयावर का बोलत नाहीत? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान यावेळी टीका करताना संजय राऊतांची जीभ पुन्हा घसरली.
#SanjayRaut #EknathShinde #BhagatSinghKoshyari #DevendraFadnavis #CentralMinister #BJP #ChhatrapatiShivajiMaharaj #Shivsena #NCP #Congress #MahavikasAghadi #Maharashtra